Prakalpgrast Pramanpatra-प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्र ||
- विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टॅम्पसह.
- ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
- रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
- संबंधित जमीन संपादीत झाली असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तहसिलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
- संपादीत जमीन/मालमत्ता चा मावेजा मिळाला असल्यास सी.सी.फॉर्मचा (अवार्ड नक्कल) उतारा.
- संपादीत जमीन/मालमत्तेची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
- ई– स्टेटमेंटची नक्कल प्रत.
- मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
- घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
- प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे वारस प्रमाणपत्र व वारसाचे शपथपत्र.
- प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
- तलाठ्यांचे जमीन संपादित झाल्याचे प्रमाणपत्र.
- शिधापत्रिकेची / रेशनकार्ड प्रत.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नामनिर्देशीत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज फोटो.
Read More : EWS Certificate - EWS प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकीया ||
तलाठी यांचे होल्डींग प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसिल कार्यालय येथे विहीत नमुन्यात अर्ज सादर करुन तहसिलदार यांचे कडील होल्डींग प्रमाणपत्र हस्तगत करावे । त्यानंतर आपल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करून सदरील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करावे।
हे पण वाचा 👉Caste Validity in Marathi- जात पडताळणी - जात वैधता कशी करायची ?
FAQ
प्रश्न :- 1) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण नियम
उत्तर - प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पासून लाभ घेतला नसल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र इतर वारसास हस्तांतरणकरता येऊ शकते.
प्रश्न :- 2) प्रकल्पग्रस्त म्हणजे काय ?
उत्तर -.शासकीय कामांसाठी खाजगी मालमत्ता किंवा जमिन जेव्हा संपादीत होते. त्याला प्रकल्पग्रस्त म्हणतात.
प्रश्न :- 3) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे ?
उत्तर -तलाठी यांचे होल्डींग प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसिल कार्यालय येथे विहीत नमुन्यात अर्ज सादर करुन तहसिलदार यांचे कडील होल्डींग प्रमाणपत्र हस्तगत करावे । त्यानंतर आपल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करून सदरील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करावे.